मराठी संगीताच्या विशाल आणि बहुरंगी दालनात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भारतीय संगीताचं जागतिक कलाक्षेत्रातलं योगदान आपल्याला ज्ञात आहेचं.अभिजात हिंदुस्तानी संगीताने अखिल विश्वाला कितीतरी अमोघ अशी कलात्मक लेणी प्रदान केली. श्रांत मनाला शांत करणार्या, रसिकांना अनेकविध पद्धतींनी रिझवणार्या, जीवनात आनंदाची उधळण करणार्या अश्या या ऐतद्देशीय संगीताचे ’लोकसंगीत’, ’शास्त्रीय’, ’उपशास्त्रीय’, ’सुगमसंगीत’, ’नाट्यसंगीत’ असे निरनिराळे प्रकार सर्वश्रुत आहेत. शिवाय भारतासारख्या खंडप्राय देशात हे सर्व उपप्रकार वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या निष्ठेने उपासले जातात. त्यापैकीच एक असलेल्या ’मराठी’ भाषेतील संगीत ठेव्याचा आनंद आपल्याला या संकेतस्थळावर घेता येणार आहे. |